प्रभा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक व श्री स्वामी समर्थ केंद्राचा संयुक्त उपक्रम; तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार
नशिराबाद : नशिराबाद येथील प्रभा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक आणि श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक २८ मे २०२६ रोजी मोफत दंत तपासणी व उपचार सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांना दंत आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हे शिबिर नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूलसमोरील श्री स्वामी समर्थ केंद्रात सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत पार पडणार आहे. शिबिरात प्रसिद्ध रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉ. युवराज रोटे (B.D.S., M.D.S.) हे नागरिकांची मोफत दंत तपासणी करून तोंडाच्या विविध आजारांबाबत तसेच शस्त्रक्रियांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
विशेष म्हणजे, शिबिरामध्ये नोंदणी करून उपस्थित राहणाऱ्या रुग्णांना पुढील हॉस्पिटलमधील उपचारांवर विशेष सवलत देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. शिबिराचे आयोजन श्री स्वामी परिवार, नशिराबाद यांच्या वतीने करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिराची माहिती
दिनांक: २८ मे २०२६ (गुरुवार)
वेळ: सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत
स्थळ: श्री स्वामी समर्थ केंद्र, न्यू इंग्लिश स्कूलसमोर, नशिराबाद
मार्गदर्शक: डॉ. युवराज रोटे (रूट कॅनल स्पेशालिस्ट)
संपर्क व नाव नोंदणी
श्री. गणेश चव्हाण: ७३८५०१८७७८
श्री. मुकुंदा रोटे: ९४२१२१३७३८
