२८ जून रोजी विशेष मोहिम; नियुक्त पोलिओ बुथ आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध सुविधा
नशिराबाद (प्रतिनिधी): नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आज, रविवार (दि. २८ जून २०२६) रोजी ‘पोलिओ रविवार’ विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात येणार असून, पालकांनी आपल्या पाल्यांना लस देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
‘पोलिओमुक्त भारत‘ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
आरोग्य विभागाने “दोन थेंब जीवनाचे संरक्षण” आणि “आपले मूल, आपले भविष्य – पोलिओमुक्त भारत घडवूया!” या संदेशाद्वारे नागरिकांना मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
मोहिमेची माहिती :
- दिनांक: २८ जून २०२६ (रविवार)
- लाभार्थी: ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालके
- ठिकाण: नशिराबाद परिसरातील सर्व नियुक्त पोलिओ बुथ व प्राथमिक आरोग्य केंद्र
नागरिकांनी आपल्या घरातील तसेच परिसरातील सर्व बालकांना पोलिओची लस पाजून राष्ट्रीय आरोग्य अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद यांनी केले आहे.
