दैनिक ‘जन सम्राट टाईम्स’
तुमचा आवाज, तुमची चळवळ…!
उपेक्षितांच्या हक्काचे व्यासपीठ
लोकशाहीची मूल्ये जपणारे, समतेचा विचार मांडणारे आणि समाजाच्या परिवर्तनासाठी कटिबद्ध असणारे, मुंबईतून प्रकाशित होणारे आपले हक्काचे राज्यव्यापी दैनिक — ‘जन सम्राट टाईम्स’.
आजच्या धावपळीच्या युगात मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे अनेकदा तळागाळातील प्रश्न, सामाजिक चळवळी आणि वंचितांचे लढे मांडण्यास कमी पडतात. मात्र, ‘जन सम्राट टाईम्स’ याला अपवाद ठरणार आहे. आम्ही कटिबद्ध आहोत अशा बातम्यांसाठी, ज्यांना इतरत्र जागा मिळत नाही!
दैनिक जन सम्राट टाईम्स – लोकशाहीवादी, समतावादी आणि परिवर्तनाचा साथी!