शिक्षण, समाजसेवा व साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल; २ ऑगस्ट रोजी शेगाव येथे होणार गौरव
उल्हासनगर | विशेष प्रतिनिधी (सुरेश जगताप)
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉ. अनिल गणपत पावसे यांची ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार-२०२६’ साठी निवड करण्यात आली आहे.
दैनिक लोक युवाच्या वर्धापनदिनानिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शेगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
डॉ. पावसे यांनी शिक्षण, समाजसेवा, साहित्य, सांस्कृतिक उपक्रम तसेच वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराच्या घोषणेनंतर सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. अनिल गणपत पावसे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
