भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयात स्वर्गीय दादासाहेब अजित पवार यांची जयंती श्रद्धापूर्वक साजरी
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन; विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन
पाळधी बु | प्रतिनिधी
भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालय, पाळधी बु येथे स्वर्गीय दादासाहेब अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली. तसेच दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी स्वर्गीय दादासाहेब अजित पवार यांच्या सामाजिक, शैक्षणिक व लोकहितकारी कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या शिस्तीत व उत्साहाने कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षकांनी केले.
