भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने कार्यकर्ते, महिला आणि नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
शिवराम जाधव सोयगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) | प्रतिनिधी
उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सोयगाव तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या जवानांनी, महिलांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बंद यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सोयगाव येथे सकाळी ७ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि विविध मागण्यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
