पारोळा शहराच्या विकासाला कोट्यवधींची चालना; विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन उत्साहात
५०० कोटींहून अधिक विकासकामांना मंजुरी; रस्ते, प्रकाश व्यवस्था, स्मशानभूमी, स्मारक व उद्यानांच्या कामांचा समावेश
पारोळा | प्रतिनिधी : संदीप पाटील
आमदार आबासाहेब चिमनरावजी पाटील यांच्या प्रयत्नांतून आणि आमदार अॅड. अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून पारोळा शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळाली आहे. शहराच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांहून अधिकची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली असून, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून पारोळा नगरपरिषद हद्दीत साकारण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आमदार अॅड. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
रस्ते, प्रकाश व्यवस्था आणि स्मशानभूमी सुशोभीकरणाला प्राधान्य
या विकासकामांमध्ये पारोळा शहरात एलईडी स्ट्रीट लाईट व हायमास्ट दिवे बसविण्यासाठी ४ कोटी रुपये, अमळनेर रोड काँक्रीटीकरणासाठी २.४० कोटी रुपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपये, धुळे रोडलगत स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी ४१ लाख रुपये तसेच धरणगाव रोडलगत स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी १.२५ कोटी रुपये खर्चाच्या कामांचा समावेश आहे.
याशिवाय शहरातील गार्डन, उद्याने, महामार्ग व विविध खुल्या जागांवर वृक्षारोपण करण्यात येणार असून, त्यामुळे शहराच्या सौंदर्यात आणि पर्यावरणीय सुविधांमध्येही भर पडणार आहे.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी नगराध्यक्ष गोविंदआबा शिरोळे, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अतुलअण्णा पवार, उपनगराध्यक्ष अॅड. रोहनदादा मोरे, शिवसेना शहरप्रमुख व गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनीषभाऊ पाटील, मुख्याधिकारी तुषारजी नेरकर यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, समित्यांचे सभापती, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच शेतकी संघाचे डॉ. राजेंद्र पाटील, अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक पंकज मराठे, शिवसेना प्रतोद तथा नगरसेवक नितीनभाऊ सोनार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. मंगेशअण्णा तांबे, भाजपा प्रतोद तथा नगरसेवक अमोलदादा शिरोळे, नगरसेवक राजूभाऊ कासार, मनोजभाऊ जगदाळे, बापू मिस्तरी, राजूबापू पाटील, छोटूभाऊ पाटील, प्रमोदशेठ कासार, संदेश शिरोळे, भावडूभाऊ राजपूत, विवेक पाटील, नजीरखान बेलदार, विनोदभाऊ पाटील, दगडू पवार, दिपकदादा अनुष्ठान, भूषण टिपरे, इमरान शेख, कैलासआण्णा पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
नागरिकांचीही मोठी उपस्थिती
लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे पदाधिकारी व सदस्य, पत्रकार, विविध तालुका, जिल्हा व राज्यातून आलेले मातंग समाज बांधव, माता-भगिनी तसेच पारोळा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ते, प्रकाश व्यवस्था, स्मशानभूमी, स्मारके, उद्याने आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून पारोळा शहरातील मूलभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. आगामी काळात मंजूर विकासकामांमुळे शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
