लासुर येथे महाकाल ग्रुपतर्फे भव्य रक्तदान शिबिर; ८१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष व संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त सामाजिक उपक्रम
चोपडा | प्रतिनिधी – राहुल पाटील
लासुर येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाकाल ग्रुप, लासुर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. माळी समाज मंगल कार्यालय, लासुर येथे सकाळी ८ वाजता हे शिबिर पार पडले.
या रक्तदान शिबिरास क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश तसेच क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ए. के. गंभीर सर, उपाध्यक्ष नरेंद्र महाजन, सचिव किशोर माळी, सहसचिव नंदलाल माळी, लोकल ऑडिटर प्रकाश माळी यांच्यासह क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे सर्व संचालक तसेच विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
८१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
या शिबिरात लासुर व चौगाव येथील ८१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
शिबिरात सहभागी रक्तदात्यांसाठी चहा व बिस्कीटची व्यवस्था करण्यासाठी क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे सचिव किशोर माळी सर व संचालक संजय महाजन यांनी सहकार्य केले.
आयोजनासाठी महाकाल ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचे परिश्रम
शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाकाल ग्रुपचे अध्यक्ष पवन महाजन, उपाध्यक्ष साहेबराव मगरे, सचिव अमोल गंभीर, खजिनदार निलेश राजकुळे, सदस्य जितेंद्र महाजन, भूमेश्वर मगरे, प्रेमराज शेलकर, महेंद्र माळी, आर. डी. महाजन, महेश महाजन, विनोद मगरे, नितीन माळी, योगेश माळी, समाधान माळी, मनोज महाजन आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे माजी सहसचिव अरुण महाजन यांनी मानले.
