‘आम्ही भारताचे लोक’च्या राज्यस्तरीय नियुक्त्या जाहीर
डॉ. अविनाश मनवर, सुनंदा साबळे, वैशाली देठे व संघशिल भद्रे यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
पुणे | प्रतिनिधी : एस. एन. नांदेडकर
‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’ (महाराष्ट्र राज्य)च्या राज्यस्तरीय नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. चळवळीच्या मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली.
यामध्ये डॉ. अविनाश मनवर यांची राज्य सांस्कृतिक विभाग प्रमुख, सुनंदा साबळे यांची राज्यस्तरीय स्पर्धा व उपक्रम नियोजन प्रमुख, वैशाली देठे यांची राज्य साहित्यिक व कलावंत समन्वयक प्रमुख, तर संघशिल भद्रे यांची राज्य प्रसिद्धी व जनसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्या जबाबदाऱ्यांमुळे ‘आम्ही भारताचे लोक’च्या राज्यस्तरीय कार्याला अधिक व्यापकता आणि गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सांस्कृतिक, साहित्यिक, कलावंत, प्रसिद्धी तसेच विविध सामाजिक उपक्रमांना प्रभावी स्वरूप देण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी कार्यरत राहणार आहेत.
या नियुक्त्यांचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
