सीनियर जर्नलिस्ट असोसिएशनच्या उत्तर पुणे जिल्हाध्यक्षपदी विजय सुराणा यांची बिनविरोध निवड
ज्येष्ठ व नवोदित पत्रकारांच्या समन्वयातून संघटनेचे कार्य अधिक प्रभावी करण्याचा निर्धार
पुणे : प्रतिनिधी
सीनियर जर्नलिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्यच्या उत्तर पुणे जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.
पत्रकारांच्या विविध प्रश्नांना व अडचणींना संघटितपणे वाचा फोडण्यासोबतच ज्येष्ठ पत्रकारांचा अनुभव आणि नवोदित पत्रकारांची ऊर्जा यांचा समन्वय साधून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे काम करण्यासोबतच पत्रकारिता क्षेत्रातील सकारात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील, सरचिटणीस संजय जोशी, पुणे शहर अध्यक्ष मिलिंद वैद्य, सचिव चंद्रकांत कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. विजय सुराणा यांच्या निवडीबद्दल उपस्थित पदाधिकारी व पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
