मीनाताई ठाकरे स्मृतिदिनानिमित्त नंदुरबारात शिवसैनिकांकडून अभिवादन
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात स्मृतिदिन कार्यक्रम; जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
नंदुरबार | प्रतिनिधी
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय, नंदुरबार येथे मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते तथा नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ, जिल्हाप्रमुख पंडित माळी, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सोनल चव्हाण, शिवसेना कार्याध्यक्ष मन्नानगणी शिकलीकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इम्तियाज कुरेशी, युवासेना सहप्रमुख एजाज काजी, वाहतूक सेना शहरप्रमुख खंडू माळी, अल्पसंख्यांक आघाडी उपप्रमुख इम्तियाज खान, जनक त्रिवेदी यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मीनाताई ठाकरे यांच्या कार्याला उजाळा
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मीनाताई ठाकरे यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचे स्मरण केले. त्यांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करत शिवसेनेच्या संघटनात्मक वाटचालीत कार्यकर्त्यांनी एकजुटीने योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदरपूर्वक अभिवादन करून मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतींना नमन केले.
