बाभळे गावचे सुपुत्र प्रवीण पाटील यांची चोपडा पंचायत समितीत डेटा एन्ट्री ऑपरेटरपदी निवड
जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर मिळविले यश; बाभळे गावासह चोपडा तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव
चोपडा / बाभळे, ता. चोपडा : बाभळे गावचे सुपुत्र श्री. पाटील प्रवीण संजय यांची चोपडा पंचायत समिती येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल बाभळे गावासह चोपडा तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रवीण पाटील हे सर्वसामान्य कुटुंबातून आले असून, त्यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविलेल्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रवीण पाटील यांच्या निवडीमुळे बाभळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या यशातून गावातील तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील युवकांनी मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धात्मक क्षेत्रात यश संपादन करावे, यासाठी त्यांची वाटचाल प्रेरणादायी ठरणार आहे.
या निवडीबद्दल शुभेच्छुक श्री. विजयकुमार पाटील, शिक्षक – बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रवीण पाटील यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. पंचायत समितीतील आपल्या जबाबदारीच्या पदावर ते उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रवीण पाटील यांच्या यशाबद्दल बाभळे गावातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच चोपडा तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
शुभेच्छुक :
विजयकुमार पाटील
शिक्षक – बृहन्मुंबई महानगरपालिका
