आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आत्मसन्मान फाउंडेशनमध्ये विविध साहित्याचे वाटप
गरजू घटकांना मदतीचा हात; मनोरुग्णांना मिष्टान्न, पुरुषांना टी-शर्ट तर महिलांना कपड्यांचे वाटप
बोदवड | प्रतिनिधी : मुक्ताई विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोदवड येथील आत्मसन्मान फाउंडेशनमध्ये रविवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता गरजू व वंचित घटकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

या उपक्रमांतर्गत आत्मसन्मान फाउंडेशनमधील मनोरुग्णांना मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू पुरुषांना टी-शर्ट आणि महिलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. साहित्य व मिष्टान्न मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव दिसून आले.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमामुळे गरजू घटकांना आधार मिळाला. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील गरजू व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन मदतीचा उपक्रम राबविण्यात आल्याने उपस्थितांनी त्याचे कौतुक केले.

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांमुळे समाजातील वंचित घटकांना मानसिक आधार मिळण्यासोबतच त्यांच्याप्रती असलेली संवेदनशीलता आणि माणुसकीची भावना अधिक दृढ होते. वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या या उपक्रमातून समाजातील विविध घटकांना आपलेपणाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या वेळी हर्षराज पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भाऊ भोई, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज भाऊ राणे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक उपाध्यक्ष अफसर खान, व्यापारी संघटना सचिव कैलास भाऊ जावरे, गिरधारी शेठ पणजवानी, महेश शेठ शर्मा, अल्पसंख्यांक कलीम शेख, नगराध्यक्षा मिराबाई दिनेश माळी, उपनगराध्यक्षा रेखा संजय गायकवाड, नगरसेवक निलेश माळी, नगरसेवक सुनील भाऊ बोरसे, नगरसेवक राजेश भाऊ नानवाणी, नगरसेवक हकीम बागवान, नगरसेवक जाफर भाई, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ देशमुख, प्रभाकर पाटील, मनोज भाऊ नानवाणी, हरीष भाऊ नानवाणी, गोपाल अग्रवाल, मिलिंद भाऊ बडगुजर, देवा भाऊ खेवलकर, विनोद पाडर, राकेश भाऊ खत्री, युवा सेना तालुकाध्यक्ष अजय भाऊ पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून ‘वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजू घटकांसोबत वाटून घेणे’ हा सामाजिक संदेश देण्यात आला. त्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




