नांदेड जिल्ह्यात ‘आम्ही भारताचे लोक’ची जम्बो कार्यकारिणी जाहीर
ग्रामीण व शहर विभागाची संघटनात्मक बांधणी; तालुका-शहरनिहाय पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या
पुणे / प्रतिनिधी : ‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य)’च्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण व शहर विभागाची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध तालुके, शहरे तसेच ग्रामीण भाग चळवळीच्या संघटनात्मक प्रवाहाशी जोडण्याच्या दृष्टीने ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
राज्य प्रसिद्धी व जनसंपर्क प्रमुख तथा नांदेड जिल्हा समन्वयक (प्रभारी) संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर तसेच मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक यांच्या संपर्क, समन्वय आणि प्रयत्नांतून नांदेड जिल्ह्यातील संघटनात्मक रचना उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील विविध स्तरांवर जबाबदार पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून चळवळीचे कार्य व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
तालुका व शहरनिहाय जबाबदारी
नांदेड उत्तरसाठी संजय खंदारे, नांदेड दक्षिणसाठी करण इंगोले, मुखेडसाठी संघर्ष भद्रे, कंधारसाठी धम्मदीप गायकवाड, लोहासाठी किशोर भावे, मुदखेडसाठी अशोक खिल्लारे, धर्माबादसाठी कुलदीप मस्के, देगलूरसाठी मंगलदीप सिताफुले, हदगावसाठी हर्षल औटे, हिमायतनगरसाठी विजय वाठोरे, अर्धापूरसाठी सिद्धार्थ सोनकांबळे, उमरीसाठी सुमेध तुरेराव, किनवटसाठी शिलरत्न पाटील, नायगावसाठी राहुल कांबळे, बिलोलीसाठी प्रतीक वाघमारे, भोकरसाठी प्रशांत हणमंते आणि माहूरसाठी गुणवंत थोरात यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जिल्हास्तरावरही विविध नियुक्त्या
जिल्हा स्तरावर संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर हे जिल्हा समन्वयक (प्रभारी) म्हणून कार्यरत राहणार आहेत. कुणाल गौतम लांडगे यांची जिल्हा संघटक प्रमुखपदी, तर सारिकाताई सावंत व रेखाताई पवार यांची महिला जिल्हा संघटक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लक्ष्मण पांडुरंग वाघमारे यांच्याकडे दस्तऐवजीकरण प्रमुखपदाची, आनंद पंडित सर यांच्याकडे सांस्कृतिक उपक्रम प्रमुखपदाची, भीमराव गंगाधर जोंधळे यांच्याकडे शिस्तप्रमुखपदाची, तर सम्राट नरवाडे व सुधाकर तुरे यांच्याकडे प्रसिद्धी व जनसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय विविध विभागांसाठीही प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनात्मक विस्तारावर भर
नांदेड जिल्ह्यात उभारण्यात आलेली ही संघटनात्मक रचना इतर जिल्ह्यांमध्येही संघटन उभारणीसाठी संदर्भ ठरावी, या उद्देशाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तालुके, शहरे आणि ग्रामीण भाग चळवळीशी जोडून सक्रिय व जबाबदार टीम उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे ‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’च्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
