Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»खरात प्रकरणातील ‘डर्टी’ व्हिडिओचा बाजार; खाकीतच दडलेत का ‘झारीतले शुक्राचार्य’? विरोधक आणि जनतेचा संतप्त सवाल!
महाराष्ट्र

खरात प्रकरणातील ‘डर्टी’ व्हिडिओचा बाजार; खाकीतच दडलेत का ‘झारीतले शुक्राचार्य’? विरोधक आणि जनतेचा संतप्त सवाल!

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Kharat, The Scandal, 'Dirty', Video, The Market, The Khaki, 'The Saboteur Within'
Kharat, The Scandal, 'Dirty', Video, The Market, The Khaki, 'The Saboteur Within'
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

विक्रांत पाटील

गल्लीपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात सेक्स स्कँडलमध्ये आता एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वळण आले आहे. ज्या पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन सरकार देत आहे, त्याच महिलांचे अत्यंत वैयक्तिक आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे आणि काही गुन्हेही दाखल झाले आहेत; मात्र खरा प्रश्न हा आहे की, ज्या व्हिडिओंचा ‘मास्टर पेन ड्राईव्ह’ पोलिसांच्या ताब्यात आहे, ते व्हिडिओ बाहेर येतातच कसे? पोलीस यंत्रणेतच बसलेले कुणी ‘झारीतले शुक्राचार्य’ या पीडितांच्या अब्रूचा लिलाव करत आहेत का? असा जळजळीत प्रश्न आता विचारला जात आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पुराव्यांसह १०० हून अधिक व्हिडिओ असलेला डेटा पोलिसांच्या स्वाधीन केला होता. तपास यंत्रणांकडे हे संवेदनशील पुरावे असतानाही, एकापाठोपाठ एक व्हिडिओ टेलिग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर व्हायरल होत आहेत. जर हे पुरावे ‘सीलबंद’ असायला हवेत, तर मग ते सायबर गुन्हेगारांच्या हाती कसे लागत आहेत? ही केवळ तांत्रिक चूक नसून पीडितांना पुन्हा एकदा मानसिक आणि सामाजिक पातळीवर संपवण्याचा हा एक नियोजित कट वाटत आहे. पोलिसांच्या तावडीतून माहिती लीक होणे हा खाकी वर्दीवरील मोठा कलंक असल्याची टीका सर्व स्तरांतून होत आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरून सरकारला आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे. “पोलीस यंत्रणेवरचा विश्वास उडावा अशी ही परिस्थिती आहे. व्हिडिओ व्हायरल होण्यामागे पोलीस दलातीलच काही भ्रष्ट घटक किंवा राजकीय वरदहस्त असलेले लोक असण्याची दाट शक्यता आहे,” असे खळबळजनक विधान दानवे यांनी केले आहे. संशयाची सुई आता थेट तपास यंत्रणेकडे वळली असून, गुन्हेगारांना वाचवण्यासाठी की पीडितांचा आवाज दाबण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत, याचे उत्तर गृहमंत्रालयाने देणे अपेक्षित आहे.

केवळ गुन्हे दाखल करून आणि इशारे देऊन हे थांबणार नाही. ज्या सायबर युनिटकडे हा तपास आहे, तिथल्याच कर्मचाऱ्यांचे फोन आणि हालचाली तपासण्याची वेळ आली आहे. जर सरकारी यंत्रणा स्वतःच्या तावडीतील पुराव्यांची गोपनीयता राखू शकत नसेल, तर कोणत्याही महिलेने अन्यायाविरुद्ध पोलिसांत का जावे? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. पीडितांच्या ओळखीचा आणि खाजगी आयुष्याचा असा ‘बाजार’ होणे हे सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी अत्यंत क्लेशदायक आहे.

आता चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा केवळ पोकळ घोषणा ठरणार की, खरोखरच ‘झारीतल्या त्या शुक्राचार्यांचा’ बुरखा फाडून त्यांना तुरुंगात धाडले जाणार? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारत आहे. या प्रकरणातील मूळ गुन्हेगार खरात तर गजाआड आहेच, पण ज्यांनी या महिलांच्या सन्मानाचा कचरा केला, त्या ‘पांढरपेशा’ गुन्हेगारांचा शोध लागणेही तितकेच गरजेचे आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleहोर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे 2 पेट्रोलियम जहाजे रवाना
Next Article रुपया प्रथमच ९५ पार; डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळी, कच्च्या तेलाचा भडका आणि जागतिक तणावाचा मोठा फटका
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?