किन्ही येथे विजय भाऊ निकम यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी निवड
CBSE जिल्हा परिषद आदर्श शाळेच्या विकासासाठी काम करण्याचा व्यक्त केला निर्धार; मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांकडून सत्कार
किन्ही, ता. सोयगाव | शिवराम जाधव (प्रतिनिधी)
किन्ही : वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते विजय भाऊ निकम यांची किन्ही, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर येथील CBSE जिल्हा परिषद आदर्श शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे किन्ही गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडीनंतर आदर्श शाळा किन्ही येथे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांच्या हस्ते विजय भाऊ निकम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, पालक तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश सोनवणे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार
सत्काराला उत्तर देताना विजय भाऊ निकम म्हणाले, “माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीला मी पूर्ण न्याय देईन. आदर्श शाळा किन्हीचा शैक्षणिक दर्जा आणखी उंचावण्यासाठी, गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.”
त्यांच्या निवडीबद्दल वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच किन्ही ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
