पारोळ्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा ३१ वा वर्धापन दिन उत्साहात
मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळवाटप करून सामाजिक बांधिलकी जपली
पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा ३१ वा स्थापना दिवस पारोळा येथे सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने श्री. संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिश्रम मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.
दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर परिश्रम मूकबधिर विद्यालय, पारोळा येथील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. वर्धापन दिनाचा आनंद सामाजिक उपक्रमातून साजरा करून महासंघाने सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
या कार्यक्रमास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान, तालुकाध्यक्ष दयाराम मोरे, कर्मचारी आघाडीचे तालुकाध्यक्ष सुकलाल साळुंखे, रतिलाल मोरे, शहराध्यक्ष रवींद्र अहिरे, किरण पवार, समाधान ठाकरे, ईश्वर अहिरे, संतोष वाघ, प्रकाश महाले, करण साळुंखे, पंकज खजुरे, उज्वल मंगळे, विजय बागुल, रवींद्र विसावे यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचण्याचा महासंघाचा प्रयत्न यावेळी अधोरेखित झाला.
