खवशी जि.प. शाळेच्या शालेय शिक्षण समिती अध्यक्षपदी दिनकर पवार
उपाध्यक्षपदी निता बाविस्कर यांची बिनविरोध निवड; नव्या कार्यकारिणीची घोषणा
धरणगाव प्रतिनिधी : खवशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीची २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नव्याने कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी दिनकर मधुकर पवार, तर उपाध्यक्षपदी निता बाविस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शालेय शिक्षण समितीच्या कार्यकारिणीत सोनाली मराठी, कांचन कोळी, आशाबाई गोसावी, प्रतिभा पाटील, सिकंदर सोनवणे आणि किशोर वाघ यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. तसेच तज्ञ सदस्यपदी दीपक सूर्यवंशी, तर शिक्षक प्रतिनिधीपदी पूनम पवार यांची निवड करण्यात आली.
यावेळी मावळते शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष राहुल मराठे, विकास सोसायटीचे माजी चेअरमन कैलास मुरलीधर पाटील, सामाजिक कार्यकर्ते हरिप्रसाद कापडे, संजय कापडे, राहुल सूर्यवंशी, योगराज शिरसाठ, भगवान पाटील, दीपक पाटील, ज्ञानेश्वर कोळी, अरुण भगवान गोसावी, चंद्रकांत बाविस्कर, शिवबा कापडे यांच्यासह महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेषा शाळेचे मुख्याध्यापक अरुण पवार यांनी मांडली. उपस्थित मान्यवरांचे आभार शिक्षिका पूनम पवार यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या पोषण आहार कर्मचारी कुसुमताई शिरसाट आणि मदतनीस सुलभा पवार यांनी परिश्रम घेतले.
