महापरिनिर्वाण दिन विशेषांकासाठी लेख, कविता व जाहिराती पाठवा!
‘आम्ही भारताचे लोक’ आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे राज्यभरातील लेखक, कवी, विचारवंत आणि हितचिंतकांना जाहीर आवाहन
पुणे | प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘आम्ही भारताचे लोक’ (आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने विशेषांक प्रकाशित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या विशेषांकाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार, सामाजिक परिवर्तनाचा संघर्ष, संविधानिक मूल्ये आणि आंबेडकरी चळवळीची वाटचाल जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी राज्यातील लेखक, कवी, विचारवंत आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपले अप्रकाशित लेख, कविता आणि वैचारिक लिखाण पाठवावे, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक यांच्या मार्गदर्शनाखाली हा साहित्यिक उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेषांकात बाबासाहेबांचे विचार, सामाजिक समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, संविधानिक लोकशाही आणि आंबेडकरी चळवळीतील विविध पैलूंवर आधारित साहित्याला स्थान देण्यात येणार आहे.
विशेषांकासाठी जाहिराती देऊन सहकार्याचे आवाहन
हा विशेषांक चळवळीच्या वैचारिक आणि साहित्यिक वाटचालीचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरावा, या उद्देशाने सामाजिक संस्था, संघटना, व्यावसायिक, उद्योजक आणि हितचिंतकांनी जाहिराती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील विविध भागांतील आंबेडकरी विचारांचे अनुयायी आणि साहित्यप्रेमींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
संपादकीय मंडळाची जबाबदारी निश्चित
या विशेषांकाच्या संपादकीय मंडळात संपादक म्हणून प्राचार्य तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक संघशील भद्रे (एस. एन. नांदेडकर), उपसंपादक म्हणून विराज निकम, तर कार्यकारी संपादक म्हणून ॲड. तथा एआय एज्युकेटर नितीन सर घोडके यांची जबाबदारी आहे.
सल्लागार मंडळात डॉ. अविनाश मनवर, स्वाती चव्हाण, रिता रामटेके, अंकुश सोनवणे, शुभांगी गुरचळ आणि सविता केदारे यांचा समावेश आहे.
साहित्य व जाहिरातींसाठी संपर्क
विशेषांकासाठी साहित्य संकलनाची जबाबदारी रवी गवळी आणि शशांक कदम यांच्याकडे देण्यात आली आहे.
साहित्य पाठविण्यासाठी संपर्क :
-
रवी गवळी – ९६३७६७३६९५
-
शशांक कदम – ७०३९५७०७६४
जाहिरात संकलन विभाग :
दिप्ती जाधव, प्रशांत देठे, संतोष रायते, उमेश बारसागडे, संजय पाईकराव, सतीश साखरे, राहुल जोगदंड आणि सागर भडकुंबे.
महापरिनिर्वाण दिन विशेषांकाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांना लेखणीच्या माध्यमातून अभिवादन करण्याची ही संधी असून, राज्यातील लेखक, कवी, विचारवंत, सामाजिक संस्था आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आम्ही भारताचे लोक’ चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.
