दापोरा येथे राहत्या घरात महिलेचा गळफास घेऊन मृत्यू
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट; तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव ग्रामीण प्रतिनिधी : शैलेश गुरव
दापोरा (ता. जळगाव) येथील रहिवासी सुनीताबाई विश्वनाथ वाणी (वय ५९) यांचा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी सुमारे ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी याबाबत पोलिसांना कळविले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, सुनीताबाई वाणी यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण पाटील करीत आहेत.
