किक बॉक्सिंगमध्ये भडगाव तालुक्याचा ‘पंच’; १८ पैकी १८ खेळाडूंना पदक!
१० सुवर्ण, ५ रौप्य व ३ कांस्यपदकांची लयलूट; सुवर्णपदक विजेत्या १० खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
भडगाव प्रतिनिधी – गणेश रावळ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत भडगाव तालुक्यातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. तालुक्यातून सहभागी झालेल्या १८ पैकी तब्बल १८ खेळाडूंनी पदक पटकावले, ही या कामगिरीची विशेष बाब ठरली.
भडगाव तालुक्यातील खेळाडूंनी या स्पर्धेत १० सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्यपदकांची कमाई केली. यातील सर्व १० सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची आगामी विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१० खेळाडूंची सुवर्णझेप; विभागीय स्पर्धेसाठी निवड
१४ वर्षांखालील गट :
-
शिव सतीश दाभाडे – सुवर्णपदक
-
आर्यन निलेश ब्राह्मणकर – सुवर्णपदक
-
अझहर शेख आयाज – सुवर्णपदक
-
पायल रवींद्र धोबी – सुवर्णपदक
-
समीक्षा किशोर भोई – सुवर्णपदक
१९ वर्षांखालील गट :
-
सादिया जाकीर कुरेशी खान – सुवर्णपदक
-
शिफा फिरोज पिंजारी – सुवर्णपदक
-
अफान शेख मोहिउद्दीन – सुवर्णपदक
-
रेहान नाझी मिर्झा – सुवर्णपदक
-
जिशान जाफर खान – सुवर्णपदक
या सर्व १० सुवर्णपदक विजेत्यांची पुढील विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रौप्यपदकावर पाच खेळाडूंची मोहोर
भडगाव तालुक्यातील पाच खेळाडूंनी रौप्यपदक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यामध्ये अली रियाज खाटीक, अबूबकर मोसिन खाटीक, शाहिद भिकन शेख, तहसील वसीम सय्यद आणि आर्यन जुलाल सोनवणे यांचा समावेश आहे.
तीन खेळाडूंची कांस्यपदकाची कमाई
जय सुनील अहिरे, जुनेद खान साकीर खान आणि सादिया पिंजारी यांनी कांस्यपदक पटकावत भडगावच्या पदकतालिकेत आणखी भर घातली.
प्रशिक्षकांचे मार्गदर्शन ठरले महत्त्वाचे
या सर्व यशस्वी खेळाडूंनी A.K. Warriors Karate Classचे प्रतिनिधित्व केले. खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक अबरार खान तसेच प्रशिक्षक शाहरुख मण्यार यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी, उपाध्यक्ष श्याम पाटील, सौरभ देशमुख, सौरभ पाटील, संतोष पाटील, हाजी खालील शेख आणि अजगर खान यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
जिल्हास्तरीय स्पर्धेत भडगाव तालुक्यातील खेळाडूंनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व १० सुवर्णपदक विजेत्यांना पुढील स्पर्धेसाठी मान्यवर, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
