येवतीतील अनाथ मुलींच्या मदतीसाठी एक लाखांचा धनादेश सुपूर्द!
ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या पुढाकारातून स्व. काशिनाथ बावस्कर यांच्या मुलींना आर्थिक आधार; शासकीय मदतीसाठीही पाठपुरावा करण्याच्या सूचना
येवती, ता. बोदवड, प्रतिनिधी : आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या येवती येथील स्व. काशिनाथ मारुती बावस्कर यांच्या मुलींच्या मदतीसाठी पुढाकार घेत एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राज्याचे मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून ही आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीमुळे मुलींच्या भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.
जळगाव जिल्हा पूर्वचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा बाविस्कर, माजी पंचायत समिती सभापती नवलसिंग पाटील, बोदवड भाजपा तालुकाध्यक्ष अमोल देशमुख आणि जळगाव जिल्हा पूर्व युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल महाजन यांच्या हस्ते धनादेश मुलींकडे सुपूर्द करण्यात आला.
शासकीय मदतीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना
स्व. काशिनाथ मारुती बावस्कर यांच्या मुलींच्या भविष्याचा विचार करून ना. गिरीशभाऊ महाजन यांनी येवती येथील भाजप कार्यकर्त्यांना आवश्यक मदत व सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. मुलींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले.
यासाठी भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुनील भाऊ माळी आणि उमेश भाऊ पाटील यांच्यावर पाठपुराव्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
कार्यकर्त्यांची उपस्थिती
या वेळी कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष विनोदजी डांगे, रामदास भाऊ श्रावणे, समाधान लोखंडे, सतीश बावस्कर, जितू खैरनार, विजय ठाकूर, विश्वनाथ बावस्कर, अमित पठाण, धर्मा खैरनार, प्रल्हाद ठाकूर आणि दीपक बावस्कर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अडचणीच्या काळात कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देण्याच्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे. मुलींचे शिक्षण, संगोपन आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता त्यांना पुढील काळातही आवश्यक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
