दैनिक जनसम्राट टाइम्सचे मुख्य संपादक मुकुंदजी नन्नवरे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान
पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या वतीने गौरव; आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला
पाचोरा, प्रतिनिधी : दैनिक जनसम्राट टाइम्स वृत्तपत्राचे मुख्य संपादक मा. मुकुंदजी नन्नवरे यांना आज पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने प्रतिष्ठेच्या ‘जीवन गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. माननीय आमदार किशोरजी पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते मुकुंदजी नन्नवरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे दैनिक जनसम्राट टाइम्स परिवारात आनंदाचे वातावरण असून, पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुकुंदजी नन्नवरे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
