इंग्रजी प्री-एलिमेंटरी परीक्षेत धवल चोरे जिल्ह्यात प्रथम!
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश; संस्थाध्यक्ष सोनुभाऊ मांडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार
भुसावळ (प्रतिनिधी – प्रमोद पाटील) : श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालयातील इयत्ता सहावी ‘ब’चा विद्यार्थी धवल अनंत चोरे याने सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी प्री-एलिमेंटरी परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
धवलने आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि आकलनशक्तीच्या बळावर हे यश संपादन केले. त्याला मार्गदर्शक सौ. भट मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करून त्याचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश चौधरी, पर्यवेक्षक विनोद उबाळे, शिक्षकवृंद आणि शालेय परिवारातील सदस्य उपस्थित होते. धवलच्या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा टप्पा जोडला गेला असून, त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
