योगासन स्पर्धेत नाशिक विभागातील खेळाडूंची चमकदार कामगिरी!
चार प्रकारांतील चुरशीच्या स्पर्धेनंतर गुणवंत खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; सांगली येथे रंगणार पुढील सामने
नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते विभागीय स्पर्धेचे उद्घाटन; योगसाधनेतून एकाग्रता, आरोग्य आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो – वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे
भुसावळ प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि ताप्ती स्कूल, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक विभागीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेत विभागातील खेळाडूंनी विविध प्रकारांत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. ट्रेडिशनल सोलो, आर्टिस्टिक सोलो, रिदमिक पेअर आणि आर्टिस्टिक पेअर या चार प्रकारांत झालेल्या स्पर्धांनंतर गुणवंत खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते उत्साहात झाले. मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन ताप्ती स्कूलच्या प्राचार्या नीना कटलर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, योगासन राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री संजय सावकारे म्हणाले की, योगामुळे शारीरिक आरोग्य, मानसिक सामर्थ्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे.
या विभागीय स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या चार जिल्ह्यांसह महानगर क्षेत्रांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. चारही प्रकारांत विविध वयोगटांतील खेळाडूंनी आपले कौशल्य सादर केले.

स्पर्धेचा गटनिहाय निकाल
१. ट्रेडिशनल सोलो
१४ वर्षांखालील मुली :
१. सानवी सुयश बुरुकुल
२. केतकी हेमंग शिनकर
३. तेजस्विनी सुयश बागुल
१४ वर्षांखालील मुले :
१. ध्रुपद चेतन बोरसे
२. आदित्य संजय उमरानकर
३. प्रतीक महेंद्र राऊत
१७ वर्षांखालील मुली :
१. तेजस्विनी सोमनाथ वाघ
२. प्रिया भरत पवार
३. श्रमिका केरबा अथलवाड
१७ वर्षांखालील मुले :
१. अभिनव कैलास जोहरे
२. पार्थ अर्जुन खताळ
३. मानराज योगराज चौधरी
१९ वर्षांखालील मुली :
१. यशश्री प्रदीप नांद्रे
२. नेहा सतीश पवार
३. नंदिनी बळीराम आंबेकर
१९ वर्षांखालील मुले :
१. निखिल संतोष भोई
२. प्रियांशु संतोष जाधव
३. आर्यन साहेबराव कोळी
२. आर्टिस्टिक सोलो
१४ वर्षांखालील मुली :
१. सानवी सुयश बुरुकुल
२. चारू हर्षल काळे
३. आरुषी योगेश देसले
१४ वर्षांखालील मुले :
१. चैतन्य विजय पवार
२. सत्यजित अमरजीत हंगरगेकर
३. वेदांत योगेश भोई
१७ वर्षांखालील मुली :
१. तेजस्विनी सोमनाथ वाघ
२. श्रमिका अथलवाड
३. स्वरा कुलकर्णी
१७ वर्षांखालील मुले :
१. मानराज योगराज चौधरी
२. साहिल भाऊसाहेब म्हस्के
३. अभिनव कैलास जोहरे
१९ वर्षांखालील मुली :
१. देवश्री सुभाष पाटील
२. खुशी जसवानी
३. नेहा सतीश पवार
१९ वर्षांखालील मुले :
१. सर्वज्ञ प्रेमनंद गोसावी
२. धारव लक्ष्मीकांत नेमाडे
३. नीरज सुरेश कुंभार
३. रिदमिक पेअर
१४ वर्षांखालील मुली :
१. आरोही झाल्टे व दिव्या सांखल
२. स्वरा मोगल व श्रद्धा डेरले
३. मृण्मयी दीक्षित व पूर्वा मुदगल
४. भार्गवी सोनवणे व शर्वरी कोठावदे
१४ वर्षांखालील मुले :
१. समर्थ सोमासे व सस्मित जाधव
२. अंश निसाळ व समर्थ पवार
३. राजवीर शेलार व वैष्णव जाधव
१७ वर्षांखालील मुली :
१. प्रिया पवार व पलक कदम
२. ऐश्वर्या खडके व अदिती भंगाळे
३. वर्षा मासुळे व पवित्रा पाटील
१७ वर्षांखालील मुले :
१. अभिनव जोहरे व शेख जुनेद अझरुला
२. सोहम राठोड व आशिष शेळके
३. राघवेंद्र लोहार व अर्णव खंडेलवाल
१९ वर्षांखालील मुली :
१. आशवी कोठारी व तानिया जनानी
२. अन्वी कोटीचा व ध्रुवी बडाले
३. नम्रता कोकणी व नताशा बागुल
१९ वर्षांखालील मुले :
१. निखिल भोई व धारव नेमाडे
२. जयवर्धन सुपाने व कनिष्क हिरे
३. चेस क्रमांक ३७ – भोसला मिलिटरी स्कूल
४. आर्टिस्टिक पेअर
१४ वर्षांखालील मुली :
१. चारू काळे व जिया सावलानीकर
२. दिव्या सांखळ व आरोही झाल्टे
३. मानसी कोकणी व तेजस्वी बागुल
१४ वर्षांखालील मुले :
१. चैतन्य पवार व अनय महाजन
२. प्रयाग पाटील व रुद्रप्रसाद भंगाळे
३. समर्थ सोमासे व सस्मित जाधव
१७ वर्षांखालील मुली :
१. हर्षाली वीरकर व ईश्वरी सुराडकर
२. श्रावणी जाधव व शुभ्रा वाणी
३. प्रिया पवार व पलक कदम
१७ वर्षांखालील मुले :
१. सोहम राठोड व आशिष शेळके
२. निशांत खलाणे व अभिनव गोराणे
१९ वर्षांखालील मुली :
१. अन्वी कोटीचा व ध्रुवी बडाले
२. याशवी कोठारी व तानिया जनानी
३. अमृता रायते व समृद्धी सानप
१९ वर्षांखालील मुले :
१. ओम संजय झोडगे व एम. लकी रेड्डी
२. नीरज कुंभार व पुष्पराज गायकवाड
३. श्रीवेद पवार व सम्राट जाधव
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडू सज्ज
विभागीय स्पर्धेतील गुणवंत खेळाडूंची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा सांगली येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात येणार आहे. विभागीय स्तरावर यश मिळविलेल्या खेळाडूंना आता राज्यस्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी योगासन राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी, डॉ. प्रदीप साखरे, विजय संकेत, लक्ष्मीकांत नेमाडे, सुनील चौधरी, गणेश बोदडे, गणेश टिंटोरे यांच्यासह पंच, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास पाटील यांनी केले.
या स्पर्धेमुळे नाशिक विभागातील योगासन खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत असून, पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
