भारतीय संविधानाने सामान्य माणसाला जागतिक दर्जा प्राप्त करून दिला : मुकुंद सपकाळे
संविधान गौरव दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कार्यक्रम; मान्यवरांच्या हस्ते महामानवाला अभिवादन
(प्रतिनिधी) : भारतीय लोकशाहीची गतिमानता, देशाचा विकास आणि प्रगती, शिक्षणाचे वाढते प्रमाण तसेच सामान्य माणसालाही जागतिक स्तरावर सन्मानाने उभे राहण्याची संधी भारतीय संविधानाने उपलब्ध करून दिली. हीच भारतीय संविधानाची मोठी यशस्विता आहे, असे प्रतिपादन मुकुंद सपकाळे यांनी केले.
संविधान गौरव दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुकुंद सपकाळे, डॉ. मिलिंद बागुल, मुकुंदराव सपकाळे, अमोल कोल्हे आणि बाबुलाल सोनवणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले. प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी संविधानाची भूमिका आणि महत्त्व विशद केले. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची मूल्ये दिली आहेत. या मूल्यांच्या बळावर भारतीय लोकशाही अधिक सक्षम झाली असल्याचा विचार कार्यक्रमातून मांडण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद बागुल यांनी केले, तर बापू पानपाटील यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला सुनील सोनवणे, गोपाल भालेराव, जयपाल धुरंदर, गोकुळ पोहेकर, श्रीकांत बाविस्कर, अमोल कोल्हे, वसंत सपकाळे, डॉ. प्रकाश वानखेडे, शैलेश सोनवणे, आनंद कोचुरे, सुभाष सपकाळे, संतोष गायकवाड, जगदीश सपकाळे, प्रशांत बाबुलाल सोनवणे, प्रीती वले, रवींद्र बाविस्कर, बाबुलाल विठ्ठल सोनवणे, कैलास उमाळे, रविंद्र भालेराव, मुकुंदराव सपकाळे, ज्योती बोरसे, विनोद बोरसे, शारदा इंगळे, प्रमिला इंगळे, ज्योती वंदना वानखेडे, शोभा इंगळे, उषाबाई इंगळे, शारदा तायडे, प्रमिला पगारे, विद्या झनके, नारायण सपकाळे आणि सुहास बागुल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
