लुंबिनी बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी इंजि. धर्मेंद्र झाल्टे यांची सर्वानुमते निवड!
धुळे : लुंबिनी बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट, धुळे या प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदी आयुष्मान इंजिनियर धर्मेंद्र भिवसन झाल्टे यांची दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल ट्रस्टच्या पदाधिकारी, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
धर्मेंद्र झाल्टे यांची आजवरची सामाजिक बांधिलकी, प्रशासकीय कौशल्य आणि विधायक दृष्टिकोन ट्रस्टच्या प्रगतीसाठी निश्चितच मोलाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली ट्रस्टच्या माध्यमातून धम्मप्रसार, शैक्षणिक उपक्रम आणि विविध समाजोपयोगी कार्यांना अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल, तसेच संस्थेची वाटचाल नव्या उंचीवर पोहोचेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या नव्या जबाबदारीसाठी धर्मेंद्र झाल्टे यांना यशस्वी, आरोग्यदायी आणि गौरवशाली वाटचालीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
शुभेच्छुक : सर्व पदाधिकारी, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ, लुंबिनी बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट, धुळे.
