Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

घरकुलाचा गैरवापर; सलून दुकान थाटल्याचा धक्कादायक प्रकार

April 11, 2026

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

April 11, 2026

क्रीडा स्पर्धेत भैरवी गोसावीची चमकदार कामगिरी

April 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»लातूर»‘शिंदे-फडणवीस हे सख्ख्या भावासारखे; फोडाफोडी करणे आमच्या रक्तात नाही’
लातूर

‘शिंदे-फडणवीस हे सख्ख्या भावासारखे; फोडाफोडी करणे आमच्या रक्तात नाही’

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
'Shinde-Fadnavis, friends, brothers,
'Shinde-Fadnavis, friends, brothers,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी पुन्हा जोर धरला असून, या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवून उद्धव ठाकरे गटातील खासदारांना आपल्या पक्षात आणण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, या वृत्ताचे ठाकरे गटाकडून ठामपणे खंडन करण्यात आले आहे.

दरम्यान, भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सत्ताधारी महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचा दावा केला. “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सख्ख्या भावासारखे एकत्र काम करत आहेत. आमचे सरकार अत्यंत विश्वासाने आणि एकदिलाने काम करत आहे. फोडाफोडी करणे आमच्या रक्तात नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

बावनकुळे यांनी यावेळी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडताना महायुतीचा धर्म उद्धव ठाकरे यांनीच मोडला असल्याचा आरोप केला. “उद्धव ठाकरे यांनी महायुती सोडून काँग्रेससोबत हातमिळवणी केली. त्यांच्या सरकारच्या काळात आमदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळेच अनेक आमदारांनी पक्ष सोडला,” असे ते म्हणाले.

सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, “आज महाराष्ट्रात 217 आमदारांचे मजबूत सरकार आहे. हे सरकार एकदिलाने काम करत असून विकासाला प्राधान्य देत आहे.” याचबरोबर खासदारांच्या भेटीगाठींवरून निर्माण होणाऱ्या चर्चांनाही त्यांनी फेटाळून लावले. “कोणताही आमदार किंवा खासदार सरकारमधील नेत्यांना भेटला, तर त्याचा अर्थ राजकीय हालचाली असा होत नाही. ते आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठीच येतात. त्यामुळे अशा भेटींवरून संशय घेणे चुकीचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या योजनेविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, राज्यभरात विविध टप्प्यांत शिबिरे आयोजित केली जात असून, 10 एप्रिल रोजी 450 हून अधिक शिबिरे पार पडली आहेत. पुढील टप्पे 17 एप्रिल, 8 मे आणि 15 मे रोजी होणार आहेत.

या शिबिरांद्वारे शासनाच्या तब्बल 48 योजना थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. “पणन रस्ते, तुकडेबंदी कायदा, पट्टे वाटप, स्वामित्व योजना अशा विविध उपक्रमांद्वारे सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे,” असे त्यांनी नमूद केले. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत तीन शिबिरांद्वारे सुमारे 25 हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला असून, आगामी शिबिरांत आणखी 25 हजार कुटुंबांपर्यंत योजना पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, येत्या काळात या घडामोडी कोणते वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'Shinde-Fadnavis 'शिंदे-फडणवीस brothers friends भाऊ सख्ख्या
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleधरणगावातून आंबापाणी लढ्याच्या स्मृती जागविण्यासाठी खाज्याजी नाईक स्मृती कलश यात्रेचा भक्तिमय शुभारंभ !
Next Article क्रीडा स्पर्धेत भैरवी गोसावीची चमकदार कामगिरी
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

घरकुलाचा गैरवापर; सलून दुकान थाटल्याचा धक्कादायक प्रकार

April 11, 2026

क्रीडा स्पर्धेत भैरवी गोसावीची चमकदार कामगिरी

April 11, 2026

वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक

April 8, 2026

आंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात ‘ड्राय डे’ची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

घरकुलाचा गैरवापर; सलून दुकान थाटल्याचा धक्कादायक प्रकार

By Jansamrattimes@gmail.comApril 11, 20260
Spread the love

रवंजे बुद्रुक प्रकरणात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश; तक्रारदाराचा आत्मदहनाचा इशारा एरंडोल (प्रतिनिधी) : जळगाव…

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

April 11, 2026

क्रीडा स्पर्धेत भैरवी गोसावीची चमकदार कामगिरी

April 11, 2026

‘शिंदे-फडणवीस हे सख्ख्या भावासारखे; फोडाफोडी करणे आमच्या रक्तात नाही’

April 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?