महावितरणकडून पारदर्शक बिलिंगची अपेक्षा; सिलेंडर पद्धत कायम ठेवण्यावर भर
मुंबई : वीज बिलातील कथित गोंधळ, वाढती दरवाढ आणि गॅस पाईपलाईनची सक्ती याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.)ने आवाज उठवला आहे. पक्षाचे अध्यक्ष राजाराम खरात यांनी यासंदर्भात निवेदन देत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे।
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) कडून येणाऱ्या वीज बिलांमध्ये विविध आकारांची गुंतागुंत असल्याने सामान्य नागरिक हैराण होत आहेत. स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन, कर आणि इतर शुल्कांमुळे बिल समजणे कठीण होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे वीज बिल साधे, स्पष्ट आणि पारदर्शक पद्धतीने देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे।
तसेच, जबरदस्तीने नवीन वीज मीटर बसविणे थांबवावे आणि ग्राहकांना त्याबाबत योग्य माहिती देऊनच निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। गॅस संदर्भातही नागरिकांमध्ये अस्वस्थता असल्याचे सांगण्यात
