Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शिवसेनेची सत्तेसाठी ‘पॉवर ब्लूप्रिंट’ जाहीर; २२ जिल्ह्यांची जबाबदारी १२ मंत्र्यांकडे

April 23, 2026

जळगाव बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ; तीन वर्षांत कोट्यवधींची भर

April 23, 2026

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

April 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»जळगाव»जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन
जळगाव

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Jalgaon, Leva, Patidar, Federation, Counseling, Center, Inauguration,
Jalgaon, Leva, Patidar, Federation, Counseling, Center, Inauguration,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

कौटुंबिक कलहासह शिक्षण, आरोग्य व बेरोजगारीसारख्या प्रश्नांवर मार्गदर्शन; अनोख्या लकी ड्रॉद्वारे उद्घाटन

जळगाव : कौटुंबिक कलह हा केवळ पती-पत्नीतील वादापुरता मर्यादित नसून शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी आणि सामाजिक ताणतणावाशी निगडित व्यापक विषय आहे, या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन जळगावातील ओंकारनगर येथे उत्साहात पार पडले.

दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता खान्देश शाखेच्या “कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्र”ाचा छोटेखानी पण सुबक सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार तथा माजी नगराध्यक्ष बंडू काळे, अध्यक्ष अरुण बोरोले, खान्देश महिला उपाध्यक्षा सौ. नीता वराडे, कोशाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील, जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळाचे अध्यक्ष लिलाधर चौधरी, डॉ. ॲड. सौ. ज्योती भोळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना अध्यक्ष अरुण बोरोले यांनी समुपदेशन समितीची भूमिका स्पष्ट केली. कौटुंबिक वादांसोबतच शिक्षणातील अडचणी, आरोग्याच्या समस्या, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही हे केंद्र मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात एक वेगळा उपक्रम राबवत उपस्थितांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यातून निवड झालेल्या शांताराम फेगडे यांच्या हस्ते समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या अनोख्या पद्धतीचे सर्वत्र कौतुक झाले.

यावेळी बंडू काळे यांनी समुपदेशन समितीचे काम निःपक्षपणे आणि काटेकोरपणे पार पाडण्याची ग्वाही दिली. प्रत्येक प्रकरण समाजाभिमुख दृष्टिकोनातून हाताळले जाईल, असे त्यांनी नमूद केले. माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती कमलाकर रोटे यांनीही या उपक्रमाचे स्वागत करून सहकार्याचे आश्वासन दिले.

समारंभाला लेवा पाटीदार समाजातील पदाधिकारी, सदस्य तसेच महिला-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती साधना लोखंडे यांनी सादर केलेल्या पसायदानाने वातावरण भारावून गेले.

Center Counseling Federation inauguration Jalgaon Leva Patidar उद्घाटन केंद्र जळगाव पाटीदार महासंघ लेवा समुपदेशन
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनशिराबाद एसबीआय एटीएममध्ये तीन दिवसांपासून अंधार; ग्राहकांची गैरसोय, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Next Article जळगाव बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ; तीन वर्षांत कोट्यवधींची भर
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

शिवसेनेची सत्तेसाठी ‘पॉवर ब्लूप्रिंट’ जाहीर; २२ जिल्ह्यांची जबाबदारी १२ मंत्र्यांकडे

April 23, 2026

जळगाव बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ; तीन वर्षांत कोट्यवधींची भर

April 23, 2026

नशिराबाद एसबीआय एटीएममध्ये तीन दिवसांपासून अंधार; ग्राहकांची गैरसोय, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

April 22, 2026

जगावर मोठं संकट, मोठ्या नैसर्गिक अपत्तीचे संकेत

April 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
Politics

शिवसेनेची सत्तेसाठी ‘पॉवर ब्लूप्रिंट’ जाहीर; २२ जिल्ह्यांची जबाबदारी १२ मंत्र्यांकडे

By Jansamrattimes@gmail.comApril 23, 20260
Spread the love

स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आक्रमक रणनीती; “जिंका, अन्यथा पर्याय नाही” — नेतृत्वाचा स्पष्ट इशारा मुंबई (प्रतिनिधी):आगामी…

जळगाव बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ; तीन वर्षांत कोट्यवधींची भर

April 23, 2026

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

April 23, 2026

नशिराबाद एसबीआय एटीएममध्ये तीन दिवसांपासून अंधार; ग्राहकांची गैरसोय, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

April 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?