Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»खान्देश»५० हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
खान्देश

५० हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMay 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
bribe
bribe
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

१२ लाखांच्या विकासकामांच्या बिलासाठी मागितले होते ‘७ टक्के कमिशन’

अमळनेर तालुक्यात खळबळ; आरोपी अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा

जळगाव प्रतिनिधी। करण शिंदे ।

अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, १२ लाख रुपयांच्या विकासकामांच्या बिलासाठी तब्बल ‘७ टक्के कमिशन’ मागणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे अमळनेर तालुक्यासह जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नगाव बु. (ता. अमळनेर) येथील ग्रामपंचायत अधिकारी रविंद्र देविदास पवार (वय ४८) यांनी १५ व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर विकासकामांच्या बिलासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या चुलत भावाला आरसीसी गटार बांधकाम आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याची सुमारे १२ लाख रुपयांची दोन कामे मिळाली होती. या कामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने एकूण रकमेच्या ७ टक्के प्रमाणे ₹८४ हजारांची मागणी केल्याचे समोर आले.

विशेष म्हणजे, आरोपीने यापूर्वीच ₹१३ हजार रुपये ऑनलाइन फोन-पे द्वारे स्वीकारल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. उर्वरित रकमेवर तडजोड करत अखेर ₹५० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले.

दरम्यान, तक्रारदाराने याबाबत ३० एप्रिल रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने पंचांसमक्ष सापळा रचला. अमळनेर शहरातील केलेनगर परिसरातील आरोपीच्या राहत्या घरी ही कारवाई करण्यात आली. आरोपी रविंद्र पवार हे स्वतःच्या घरातच ₹५० हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले.

या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘कमिशन संस्कृती’ पुन्हा चर्चेत

ग्रामपंचायत स्तरावर विकासकामांच्या बिलांसाठी कमिशन मागितले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असताना, या कारवाईने पुन्हा एकदा “टक्केवारीच्या खेळा”वर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ग्रामीण भागातील विकासकामांमध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील आर्थिक व्यवहारांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

एसीबीची धडक कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तागंडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, स्मिता नवघरे आणि त्यांच्या पथकाने सापळा यशस्वीपणे रचला.

या कारवाईनंतर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली असून, “आता एसीबीची नजर गावपातळीवरील भ्रष्टाचारावरही आहे,” अशी चर्चा रंगू लागली आहे.

12 lakh १२ लाख ACB Amalner bill caught Commission Crime under the Act Development excitement; Anti-Corruption Gram Panchayat Officer taking bribe Work अधिकारी अमळनेर एसीबी कमिशन’ काम कायद्यान्वये गुन्हा खळबळ; भ्रष्टाचार प्रतिबंधक ग्रामपंचायत जाळ्यात बिल लाच घेताना विकास ₹50 thousand ₹५० हजार
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
Next Article जळगावातील रस्त्यावरील मोठा खड्डा ठरत आहे अपघाताचे कारण
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By Jansamrattimes@gmail.comMay 7, 20260
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहरातील…

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?