Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»मुंबई»ग्रामरोजगार सहाय्यकांना दरमहा ठोस वेतन द्या; थकीत देयकांसाठी आंदोलन तीव्र
मुंबई

ग्रामरोजगार सहाय्यकांना दरमहा ठोस वेतन द्या; थकीत देयकांसाठी आंदोलन तीव्र

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMay 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Village employment, assistant, monthly, fixed, salary,
Village employment, assistant, monthly, fixed, salary,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

जि.प. सीईओ करिश्मा नायर यांच्याकडे संघटनेचा तगादा; १९ महिन्यांच्या थकबाकीचा प्रश्न ऐरणीवर

पारोळा  : राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांना दरमहा निश्चित वेतन आणि टी.ए./डी.ए. वेळेत मिळावे, या प्रमुख मागणीसाठी राज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटना आक्रमक झाली असून, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी ठोस मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.

शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी काढलेल्या निर्णयानुसार ग्रामरोजगार सहाय्यकांना दरमहा १० हजार रुपयांचे निश्चित मानधन देण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही न झाल्याने राज्यभरातील सहाय्यकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मागील तब्बल १९ महिन्यांचे थकीत मानधन मिळावे, या मागणीसाठी १ एप्रिल २०२६ पासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनाची दखल घेत जि.प. सीईओ करिश्मा नायर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रलंबित मागण्यांबाबत संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांशी सविस्तर संवाद साधून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला जाईल, तसेच या प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सीईओंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने ग्रामरोजगार सहाय्यकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. “न्याय मिळेल” या विश्वासाने संघटनेच्या सदस्यांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे.

निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्यासह भुषण महाजन, सूर्यभान पाटील, सचिन पाटील, भरत राठोड, प्रदीप राजपूत, शिवाजी हटकर, उत्तम पाटील, अनिल पाटील, योगेश पाटील आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शासनाने लवकरात लवकर निर्णयाची अंमलबजावणी करून थकीत मानधन वितरित करावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

assistant fixed monthly salary Village employment ग्रामरोजगार ठोस दरमहा वेतन सहाय्यक
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनवापूरात ‘बर्ड फ्लू’चा कहर; पोल्ट्री उद्योगावर मोठा घाव
Next Article नसरापूर प्रकरणावर संताप: आरोपीला वकीलपत्र न देण्याची मागणी
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By Jansamrattimes@gmail.comMay 7, 20260
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहरातील…

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?