प्रतिमापूजन करून अभिवादन; विविध मान्यवरांची उपस्थिती
धरणगाव | प्रतिनिधी (वाल्मिक पाटील)
धरणगाव येथील मा. भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने बुधवारी (दि. १७ जून २०२६) शूरवीर योद्धे महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात वाचनालयाचे सचिव योगेश पी. पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठ कार्याला अभिवादन केले.
या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, माजी नगरसेवक नंदकिशोर पाटील, देविदास माळी, सुरज गुप्ता, रवींद्र घारोटे, साहेबराव पाटील, मयूर पाटील आणि रघुनंदन वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाचा आणि स्वाभिमानी जीवनाचा आदर्श समाजाने जपण्याची गरज व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.
