आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
संदीप पाटील । पारोळा | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पारोळा बसस्थानक परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाला लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत बी. पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक अमृत चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनीष पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुदाम चौधरी, माजी शहरप्रमुख बापूसाहेब मिस्तरी, नगरसेवक मनोज जगदाळे, राजू कासार, प्रमोद कासार, विनोद पाटील, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक पंकज मराठे, नगरसेवक विवेक पाटील, नजीरखान बेलदार, पारोळा आगाराचे व्यवस्थापक सतीश सातपुते, चालक-वाहक, बसस्थानक परिसरातील व्यावसायिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि हरित पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे जतन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. वृक्षारोपणासारख्या उपक्रमांमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासह भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
“एक वृक्ष लावा… पर्यावरण वाचवा, भविष्यातील पिढ्यांना हरित वारसा द्या!” असा संदेशही यावेळी देण्यात आला.
