४५० हून अधिक नागरिकांनी घेतला सुविधेचा लाभ*
नशिराबाद: नशिराबाद शहरातील प्रभाग क्र. १ ते ५ मधील नागरिकांसाठी आज आयोजित करण्यात आलेल्या एसआयआर (SIR) नोंदणी शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या विशेष मोहिमेमध्ये आज दिवसभरात ४५० हून अधिक नागरिकांनी आपली नोंदणी पूर्ण करून या सुविधेचा लाभ घेतला आहे.
नशिराबादमधील विविध प्रभागांमध्ये हे शिबिर पार पडले, ज्यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड आणि मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यात आली. शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे नागरिकांना त्यांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे सोपे झाले.
प्रभाग क्र. १ (किरण चौधरी यांच्या घराजवळ), प्रभाग क्र. २ (श्री कृष्ण मित्र मंडळ जवळ), प्रभाग क्र. ३ (फ्रुटसेल चौक), प्रभाग क्र. ४ (पीर यासिन मिया दर्गा) आणि प्रभाग क्र. ५ (ग्रामपंचायत कार्यालय जवळ) या पाचही ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. या शिबिरामुळे स्थानिक नागरिकांचा वेळ वाचला असून त्यांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सुविधांची उपलब्धता करून देण्यात आली. या मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल स्थानिक प्रशासनासह आयोजकांचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
