वक्फ कायदा, धार्मिक स्वातंत्र्य, मॉब लिंचिंगसह विविध मुद्द्यांवर निवेदन; अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्या मागण्या
जळगाव | प्रतिनिधी
भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. शाकीर शेख यांनी केले.
देशातील मुस्लीम समाजावरील कथित मॉब लिंचिंगच्या घटना, धार्मिक स्थळांवरील हल्ले, धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचे प्रश्न, संविधानिक अधिकारांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि धार्मिक स्वातंत्र्य यासह एकूण १२ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान आंदोलकांनी वक्फ (सुधारणा) अधिनियम २०२६ रद्द करणे, संविधानातील कलम २५ ते २९ अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण, मॉब लिंचिंग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, बेकसूर मुस्लिम तरुण व उलेमांची सुटका, कम्युनल व्हायोलन्स प्रिव्हेन्शन कायदा लागू करणे, धार्मिक स्थळांवरील हल्ले रोखणे, जातीआधारित जनगणना, प्लेसेस ऑफ वर्शिप कायदा १९९१ ची प्रभावी अंमलबजावणी आदी मागण्या मांडल्या.
आंदोलनानंतर शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केंद्र सरकारकडे या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची विनंती केली.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य प्रभारी सुमित्र अहिरे, अ. करीम सालार, नियाज अली फाऊंडेशनचे अय्याज अली, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष मुबारक भाई, माजी नगरसेवक रियाज बागवान, खालिद बागवान, सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे, बहुजन मुक्ती पार्टीचे रविंद्र मोरे, खुशाल सोनवणे, रविंद्र बाविस्कर, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे हाफिज फिरोज, गनी शाह, अकील कासार, मुफ्ती खालिद, रफिक शेख, इरफान शेख, जमील शेख, सै. कलीम रिजवान शेख, पीस पार्टीचे आरिफ देशमुख, भारत मुक्ती मोर्चाचे जाकीर कुरेशी, दिलीप जाधव, डी. एम. भालेराव, मनोहर लोखंडे, त्र्यंबक सोनवणे, रमेश थाटे, दिलीप इंगळे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे चंद्रशेखर अहिरराव, दिनेश सपकाळे, सुनील सपकाळे, प्रा. किसन हेरोळे, शैलेश नन्नवरे, राष्ट्रीय मूलनिवासी पेन्शनर संघाचे मनोहर कोचुरे, सुनील सोनवणे, दिलीप तासखेडकर, संतोष साळवे, तबन ह्याळिंगे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
