नशिराबाद येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; २६ जुलै रोजी नागरिकांना विविध वैद्यकीय सेवांचा लाभ
तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, ECG, बीपी, मुख व स्तन कर्करोग तपासणीसह स्त्री आरोग्य शिबिर; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
नशिराबाद | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नशिराबाद येथे एका भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव आणि डॉ. ए. जी. भंगाळे यांचे समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर जळगाव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट), नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नशिराबाद शहर अध्यक्ष मा. श्री. गणेश नथ्थू चव्हाण हे या शिबिराचे आयोजक आहेत.
शिबिराची ठळक वैशिष्ट्ये:
तज्ज्ञ व अनुभवी डाॅक्टरांचे मार्गदर्शन व प्राथमिक तपासणी केली जाईल.
शिबिरात डाॅक्टरांच्या सल्ल्याने मोफत ECG काढण्यात येईल तसेच BP Monitor तपासणी केली जाईल.
मुख कर्करोग तपासणी शिबिर व त्यावरील उपचाराविषयी मार्गदर्शन केले जाईल.
स्तन कर्करोग तपासणी व उपचारासाठी उपलब्ध सुविधांबाबतीत मार्गदर्शन मिळेल.
तसेच विशेष स्त्री आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित केले आहे. शिबिरात आजार पणावर शक्य तितक्या गोळ्या औषधी मोफत दिल्या जातील.
तपशील:
पत्ता: श्री इच्छापूर्ती हॉल, कल्पना गणेश मंडळ, जैन मंदिराजवळ, नशिराबाद.
दिनांक:२६/०७/२०२६, रविवार.
वेळ:सकाळी ९:३० ते दुपारी १ वाजेपर्यंत.
या शिबिराच्या आयोजनासाठी नशिराबाद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच अनमोल सहकार्यात नशिराबाद नगरपरिषदेच्या नगरसेविका नसब्रीन बानो शेख मुश्ताक आणि नगरसेवक मनियार आसिफ शेख गनी शेख यांचा सहभाग आहे. नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जयेश पाटील (९१९४५१८६०१९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
