लुंबिनी बुद्ध विहारात वर्षावासाला प्रारंभ; गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
भंते धम्मज्योती यांचे अधिष्ठान स्वीकार; दररोज भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन व धम्मदेशन
प्रतिनिधी
गुरुपौर्णिमा तथा आषाढी पौर्णिमेनिमित्त लुंबिनी बुद्ध विहारात वर्षावास प्रारंभ सोहळा अत्यंत श्रद्धापूर्वक आणि उत्साहात पार पडला. यानिमित्त भंते धम्मज्योती यांनी वर्षावासासाठी अधिष्ठान स्वीकार करून वर्षावासाची औपचारिक सुरुवात केली.
वर्षावासाच्या काळात दररोज सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे सामूहिक वाचन करण्यात येणार असून, त्यानंतर भंते धम्मज्योती यांचे धम्मदेशन होणार आहे. या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक उपासक-उपासिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्षावासाच्या प्रारंभामुळे बुद्ध विहार परिसरात भक्तिमय आणि शांत वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन लुंबिनी बुद्ध विहाराचे सचिव प्राचार्य राजेंद्र बोराळकर यांनी केले.
यावेळी लुंबिनी बुद्ध विहार महिला संघाच्या अध्यक्षा कल्पना बोराळकर यांच्यासह सुमन लोंढे, गंगुबाई वाघ, सुरेखा जाधव, रेखा निकुंभे, सारिका नवगिरे, श्रावस्ती शिंदे, लता मयराळ, नूतन गांगुर्डे, कोमल सोनकांबळे, रिटा सामुद्रे तसेच साहेबराव लोंढे, किसन शिरसाठ, अनंत भामरे, साहेबराव पगारे, गौतम भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.
