गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप; यशवंत कृषी माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
गुरुपौर्णिमेनिमित्त २५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश; महर्षी व्यास पूजनासह संस्कारमय कार्यक्रम
धुळे | प्रतिनिधी
श्री सतीदेवी ट्रस्ट बोरीस संचालित यशवंत कृषी माध्यमिक विद्यालय, मोहाडी उपनगर, धुळे येथे गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजन व गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी जपत २५ गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टच्या विश्वस्त सौ. मंगलताई सुभाषराव देवरे या होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब शिवाजीराव रायमल देवरे यांच्या पुतळ्यास तसेच महर्षी व्यास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अश्विनी विलासराव देवरे (चेअरमन, वि. का. सो., बोरीस), सौ. धरती निखिल देवरे (माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद धुळे) तसेच सेवानिवृत्त शिक्षिका सौ. एल. सी. कुलकर्णी उपस्थित होत्या.
श्री मंगलनाथ शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट, धुळे यांच्या माध्यमातून २५ गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अहिरराव सर यांनी केले. सूत्रसंचालन देसले सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन यू. वाय. देवरे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
