पारोळ्यात संत शिरोमणी सावता महाराजांना अभिवादन
संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे भक्तिभावाने पूजन
पारोळा | सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) :
संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पारोळा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० वाजता महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ संत सावता माळी यांच्या प्रतिमेचे भक्तिभावाने व उत्साहात पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलास महाजन होते. यावेळी उपाध्यक्ष संजय महाजन, नगरसेविका तथा गटनेत्या अलका धीरज महाजन, नगरसेवक भूषण टिपरे, माजी नगरसेवक तथा गटनेते बापू महाजन, नगरसेवक नितीन सोनार यांच्यासह समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमास पंच युवराज महाजन, संतोष शेनपडु महाजन, ज्ञानेश्वर महाजन, भगवान महाजन, वना महाजन, सुरेश महाराज, संतोष महाजन, दिलीप महाजन, सुरेश महाजन, सोमनाथ महाजन, विक्की महाजन, गोपाल महाजन, परेश महाजन, नारायण महाजन यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी संत सावता महाराज यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन केले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
