बोरविहीर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप
आदिवासी पंच मंडळाचा उपक्रम; शिक्षणातून प्रगती साधण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
धुळे | प्रतिनिधी :
धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत बोरविहीर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त समस्त आदिवासी पंच मंडळ, बोरविहीर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा, जयपालसिंग मुंडा, तंट्यामामा भील आणि खाज्या नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादनाने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी टायगर सेना, महाराष्ट्र राज्य सचिव ॲड. प्रविण मोरे होते. यावेळी किरण (आण्णा) ठाकरे (सरपंच, बोरविहीर), गोविंदाभाऊ अहिरे (धुळे तालुकाध्यक्ष, ATS), दादाबाबा सोनवणे (बिरसा क्रांती दल, धुळे शहर), शुभमभाऊ ठाकरे, गोविंदाभाऊ माळी, अनिलभाऊ पवार, रामभाऊ सोनवणे, रामदास सोनवणे सर, शामदादा सोनवणे, प्रतापदादा माळी, राजेंद्रदादा ठाकरे, सुनीलभाऊ वाघ, विक्की ठाकरे, उमेश पवार, आकाश मोरे, गोविंदा माळी, समाधान अहिरे, दिनेश गायकवाड, मयूर माळी, रवी माळी, सागर मोरे, निलेश माळी, चेतन माळी, ऋतिक अहिरे, भटूभाऊ ढमढेरे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रांतिवीरांच्या कार्याचा जागर
यावेळी ॲड. प्रविण मोरे, गोविंदाभाऊ अहिरे आणि रामदास सोनवणे सर यांनी समाजबांधवांना महापुरुष व क्रांतिवीरांच्या कार्याची माहिती देत त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
शिक्षण हे सामाजिक व आर्थिक प्रगतीचे प्रभावी माध्यम असून, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, वाचन व लेखनाची सवय लावून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. आदिवासी दिन केवळ उत्सव म्हणून साजरा न करता शिक्षण, आरोग्य, संस्कृती आणि सामाजिक विकासाला चालना देणारे उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
समस्त आदिवासी पंच मंडळाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा सकारात्मक उपक्रम राबविण्यात आला.
