इसरणे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात; भगवान वीर एकलव्यांना अभिवादन
गावातून भव्य मिरवणूक; क्रांतिवीरांच्या विचारांना उजाळा
धुळे | प्रतिनिधी :
धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत इसरणे येथील वीर एकलव्य नगर येथे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भगवान वीर एकलव्य यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच समाजातील विविध क्रांतिवीरांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक व उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि क्रांतिवीरांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास आदिवासी टायगर सेना महाराष्ट्र राज्य सचिव ॲड. प्रविण मोरे, बंटीदादा वाघ (वीर एकलव्य प्रतिष्ठान, धुळे शहर), गोविंदाभाऊ अहिरे (धुळे तालुकाध्यक्ष, ATS), गुरु ठाकरे, शंकरभाऊ मोरे, नितीनभाऊ सोनवणे, अनिल ठाकरे, कालू ठाकरे, आप्पा सोनवणे, सुनील मोरे, अमोल मोरे, ओंकार मोरे, सुपडू मोरे, अंबर सोनवणे, सतीश सोनवणे, आकाश सोनवणे, दत्तू मोरे, पांडू मोरे, विनोद मोरे, आकाश मोरे, समाधान मोरे, प्रकाश अहिरे, जंगलू अहिरे, विकास मोरे, परमेश्वर मोरे, संतोष मोरे, खंडू मोरे, प्रवीण मोरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून आदिवासी समाजाची एकजूट, सांस्कृतिक वारसा आणि क्रांतिवीरांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या मिरवणुकीमुळे संपूर्ण इसरणे गावात आदिवासी दिनाचा जल्लोष पाहायला मिळाला.
