सारोळा जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी; तीन विद्यार्थ्यांनी पटकावला जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्तीचा मान!
इयत्ता चौथीत ७, तर सातवीत १३ विद्यार्थी पात्र; समृद्धी, तनुजा आणि श्रावणीचा विशेष गौरव
अहिल्यानगर प्रतिनिधी | बापुसाहेब घोडेस्वार
जामखेड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा, केंद्र राजुरी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर या शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटवली आहे. इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये एकूण २० विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी तीन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्तीचा मान मिळविला आहे.
इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे ७ विद्यार्थी पात्र झाले. त्यापैकी समृद्धी दीपक कळसकर हिने अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून इयत्ता चौथी जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्तीधारक होण्याचा बहुमान मिळविला.
तसेच इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे १३ विद्यार्थी पात्र झाले असून, त्यापैकी तनुजा भरत सांगळे आणि श्रावणी जालिंदर पठाडे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून इयत्ता सातवी जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्तीधारक होण्याचा बहुमान संपादन केला.
विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन
इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे, जामखेड बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ आणि राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख माजीद शेख यांनी अभिनंदन केले.
सारोळा गावच्या सरपंच रितूताई काशीद, अजयदादा काशीद, उपसरपंच हर्षद मुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश मुळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे, पालक व ग्रामस्थांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चौकट : गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन
या यशामागे पालकांसह शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संदीप भालसिंग (ग्रेड मुख्याध्यापक), वृषाली खांदवे (इयत्ता चौथी वर्गशिक्षिका), सुरेश उत्तम बर्वे (इयत्ता सातवी वर्गशिक्षक), राहुल लिमकर, प्रशांत होळकर, शबाना शेख आणि अमृता रसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सारोळा शाळेच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची क्षमता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Tags: सारोळा जिल्हा परिषद शाळा, जामखेड, शिष्यवृत्ती परीक्षा २०२६, जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्ती, समृद्धी कळसकर, तनुजा सांगळे, श्रावणी पठाडे, अहिल्यानगर
