भाजपा जळगाव पूर्व महिला मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीत बोदवडच्या अनिता अग्रवाल, योगिता खेवलकर यांची निवड
जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती; बोदवड तालुक्यातील महिलांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार
बोदवड | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) महिला मोर्चाची नूतन जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत बोदवड येथील सौ. अनिताताई संजय अग्रवाल आणि सौ. योगिताताई गोपाल खेवलकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या या कार्यकारिणीची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या आदेशानुसार करण्यात आली. भाजपा नेते तथा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हा प्रभारी अनुपभैय्या अग्रवाल, माजी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, आमदार नंदकिशोर महाजन, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत अण्णा बाविस्कर आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्याताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
बोदवडमधील पदाधिकाऱ्यांची निवड
नूतन कार्यकारिणीत बोदवड तालुक्यातून अनिताताई संजय अग्रवाल आणि योगिताताई गोपाल खेवलकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच वैशालीताई कुलकर्णी यांची जिल्हा सरचिटणीसपदी, सीमा पाटील यांची सोशल मीडिया संयोजकपदी, तर विद्या अग्रवाल, दीपमाला चांदुरकर आणि आरती बचाटे यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
निवड जाहीर होताच भाजपा बोदवड तालुका व शहराच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या निवडीमुळे बोदवड तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिलांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात बोदवड तालुक्यातील महिलांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. महिलांच्या प्रश्नांसोबतच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील, असे त्यांनी सांगितले.
