धुळे जिल्ह्यात ‘भारतगॅस लाईट झिप’ १० किलो कंपोझिट सिलिंडरचा शुभारंभ
मंजुश्री गॅस एजन्सीत भव्य उद्घाटन; हलके, पारदर्शक आणि गंजमुक्त सिलिंडर ग्राहकांच्या सेवेत
धुळे | प्रतिनिधी : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) च्या वतीने धुळे जिल्ह्यातील ग्राहकांसाठी आधुनिक ‘भारतगॅस लाईट झिप’ (Bharatgas Lite Zip) १० किलो कंपोझिट सिलिंडरचा शुभारंभ धुळे येथील मंजुश्री गॅस एजन्सी येथे उत्साहात करण्यात आला.
भारत पेट्रोलियमचे सेल्स मॅनेजर कन्हैया लाल यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच धुळे जिल्ह्यातील भारतगॅसच्या सर्व वितरकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
हलके आणि वापरण्यास सोपे
पारंपरिक लोखंडी सिलिंडरच्या तुलनेत ‘भारतगॅस लाईट झिप’ सिलिंडर वजनाने हलके असल्याने ते उचलणे आणि हाताळणे ग्राहकांना अधिक सोयीचे ठरणार आहे. कंपोझिट फायबरपासून तयार करण्यात आलेल्या या सिलिंडरमध्ये गॅसची पातळी बाहेरून दिसत असल्याने सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, याचा अंदाज ग्राहकांना सहज घेता येणार आहे.
गंजमुक्त आधुनिक डिझाइन
कंपोझिट साहित्यामुळे या सिलिंडरला गंज येत नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. आकर्षक आणि आधुनिक डिझाइनमुळे घरगुती वापरासाठीही हे सिलिंडर सोयीचे ठरणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हिरवा झेंडा दाखवून डिलिव्हरी वाहन रवाना
कार्यक्रमादरम्यान सेल्स मॅनेजर कन्हैया लाल व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘भारतगॅस लाईट झिप’च्या डिलिव्हरी वाहनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. तसेच काही ग्राहकांना प्रातिनिधिक स्वरूपात नवीन १० किलो लाईट सिलिंडरचे वितरण करण्यात आले.
‘झिप’ सेवेमुळे ग्राहकांना जलद आणि वेळेत गॅस डिलिव्हरी उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला भारतगॅसचे अधिकारी, धुळे जिल्ह्यातील विविध गॅस एजन्सींचे वितरक, मंजुश्री गॅस एजन्सीचे संचालक व कर्मचारी तसेच नागरिक आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यातील ग्राहकांसाठी हा आधुनिक सिलिंडर उपयुक्त ठरणार असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
