अतिवृष्टीतील संकटग्रस्त ६४४ कुटुंबांना शासनाची मदत
आमदार अमोलदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; पूरग्रस्त कुटुंबांना शिधा किटचे वाटप
पारोळा | सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : दि. ३० जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पारोळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरे जमीनदोस्त झाली, तर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करताना आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने शासकीय मदत मिळावी, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून मदत मिळावी, यासाठी आमदार अमोलदादा पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाराचा वापर करून पारोळा तालुक्यातील ६४४ पूरग्रस्त कुटुंबांना शिधा किट उपलब्ध करून देण्यात आले.
या शिधा किटचे वाटप आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी नायब तहसीलदार अनिल पाटील, शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनीषभाऊ पाटील, उपगटनेते तथा नगरसेवक पंकजभाऊ मराठे, नगरसेवक मनोजभाऊ जगदाळे, विवेकभाऊ पाटील यांच्यासह मान्यवर, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी कुटुंबे उपस्थित होते.
पाहणीपासून मदतीपर्यंत पाठपुरावा
अतिवृष्टीच्या संकटात नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी पाहणीपासून ते शासनस्तरावर मदत उपलब्ध होईपर्यंत आमदार अमोलदादा पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. जनतेच्या अडचणीच्या काळात प्रशासन व शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची तत्पर भूमिका महत्त्वाची ठरल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत…
शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा!
