युवा नेते लखीचंदभाऊ पाटील यांची युवासेना जळगाव लोकसभा अध्यक्षपदी निवड
आमदार किशोरआप्पा पाटील यांच्याकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन; जळगाव लोकसभा मतदारसंघात युवासेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा निर्धार
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ
शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघासह जळगाव लोकसभा मतदारसंघातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये युवा नेते लखीचंदभाऊ प्रकाश पाटील यांची युवासेना जळगाव लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी लखीचंदभाऊ पाटील यांच्यासह सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की, नवनियुक्त लोकसभा अध्यक्ष लखीचंदभाऊ पाटील आणि सर्व पदाधिकारी तळागाळातील नागरिकांपर्यंत शिवसेनेचे विचार तसेच शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना प्रभावीपणे पोहोचवतील. युवा नेतृत्वाच्या नव्या ऊर्जेमुळे पाचोरा, भडगावसह संपूर्ण जळगाव लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवनियुक्त पदाधिकारी
युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सचिव किरण साळी आणि मुख्य सचिव राहुल लोढे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या अधिकृत यादीत पुढील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
-
लखीचंद प्रकाश पाटील — लोकसभा अध्यक्ष, जळगाव लोकसभा
-
योगेश कौतिक पाटील — जिल्हा संघटक, पाचोरा
-
विकास सुरेश महाजन — जिल्हा संघटक, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव
-
राकेश संजय पाटील — जिल्हा सरचिटणीस, भडगाव
-
मयूर सुधाकर महाजन — जिल्हा सरचिटणीस, पाचोरा
-
नितीन देवाजी तायडे — जिल्हा समन्वयक, पाचोरा
-
अनिल बारकू पाटील — जिल्हा उपाध्यक्ष, पाचोरा
-
दुर्गेश अनिल वाघ — जिल्हा उपाध्यक्ष, भडगाव
-
योगेश शांताराम ठाकरे — जिल्हा संघटक उपाध्यक्ष, पाचोरा
-
राकेश नाना पाटील — जिल्हा समन्वय उपाध्यक्ष, पाचोरा
-
पुरुषोत्तम अभिमान माळी — जिल्हा संघटक उपाध्यक्ष, भडगाव
-
योगेश प्रवीण पाटील — जिल्हा समन्वय उपाध्यक्ष, भडगाव
युवा सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण
या महत्त्वपूर्ण नियुक्त्यांमुळे जळगाव लोकसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकारी व युवा सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवनियुक्त पदाधिकारी आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक कामाला गती देणार असून, आगामी काळात युवासेनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
लखीचंदभाऊ पाटील यांच्या निवडीबद्दल शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
