श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी पत्रकार हर्षल पाटील
प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव
भुसावळ | प्रतिनिधी :
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्व. अशोकभाऊ पंडित पाटील यांचे चिरंजीव, आरोग्यदूत तथा पत्रकार हर्षल पाटील (राजपूत) यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत यांच्या हस्ते हर्षल पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला.
संघटनेच्या माध्यमातून समाजहितासाठी विविध उपक्रम राबविण्यासह सामाजिक बांधिलकी जपण्याची जबाबदारी हर्षल पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश सचिव आनंदा पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप सिंह राणा, जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंग मोरे, महिला जिल्हाध्यक्ष सारिका ताई पाटील, जिल्हा सरचिटणीस चंदू चव्हाण, जिल्हा सरचिटणीस पंकज चौधरी, जिल्हा सचिव कविता पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, भुसावळ ग्रामीण तालुकाध्यक्ष नितीन पाटील, महिला तालुकाध्यक्ष जयश्री पाटील, भुसावळ कार्यकारी अध्यक्ष सुरेश पाटील, भुसावळ शहराध्यक्ष गोकुळ पाटील, महिला शहराध्यक्ष प्रतीक्षा पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गजानन पाटील, गणेश पाटील, वीरेंद्र पाटील, दयानंद पाटील, रतनसिंग पाटील, महिला सचिव श्रद्धा राजपूत, प्रियंका राजपूत, दिवानसिंग राजपूत, गणेश राजपूत, बी. एन. पाटील सर, गोपाल चौधरी, प्रतीक्षा राजपूत, राकेश तळेले, पवन तेली, चैताली राजपूत आदी उपस्थित होते.
हर्षल पाटील यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय, पत्रकारिता तसेच अन्य क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
