मैत्रीय बुद्ध विहारात राष्ट्रीय धम्म वर्षावास प्रवचन मालिकेचे ८वे पुष्प संपन्न
आऊमा.नी. ज्योतीताई भालेराव यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतीलढे’ विषयावर प्रभावी मार्गदर्शन
भुसावळ : भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत मैत्रीय बुद्ध विहार, भुसावळ येथे भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व महिला शाखेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय धम्म वर्षावास प्रवचन मालिकेचे ८वे पुष्प उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष प्रियंकाताई अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात केंद्रीय शिक्षिका आऊमा.नी. ज्योतीताई भालेराव यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतीलढे’ या विषयावर प्रवचनातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
‘क्रांतीलढे’ विषयावर प्रभावी विवेचन
आऊमा.नी. ज्योतीताई भालेराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी चळवळीचा इतिहास सोप्या आणि प्रभावी भाषेत उपस्थितांसमोर मांडला. बाबासाहेबांनी सामाजिक विषमता, अन्याय आणि अस्पृश्यतेविरोधात उभारलेल्या संघर्षाचे विविध पैलू त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समाजाने स्वीकार करून त्यांची शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले.
कार्यक्रमाला शहर संघटक आयु.नी. प्रतिभाताई शिरतूरे, आयु.नी. शोभाताई घायतडक, आयु.नी. सुजाताताई जंजाळे, आयु.नी. मायाताई निकम, आयु.नी. सीमाताई बावस्कर, आयुष्यमानी शिल्पाताई गायकवाड, आयु.नी. वैशालीताई जंजाळे, आयु.नी. वंदनाताई शेजवळ, आयु.मा. कल्पनाताई मोटे, आयु.मा. लोखंडेताई, आयु.मा. भालेरावताई यांच्यासह असंख्य उपासिका तसेच बालक-बालिकांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय धम्म वर्षावास प्रवचन मालिकेच्या माध्यमातून धम्मविचार, सामाजिक प्रबोधन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचा उपक्रम सुरू असून, या ८व्या पुष्पालाही उपासक-उपासिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
