निलेश भाऊ गुरचळ यांना ‘समाज रक्षक’ पुरस्काराने सन्मानित
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव
प्रतिनिधी | बोदवड
बोदवड : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपणारे निलेश भाऊ गुरचळ यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ‘समाज रक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे जिल्हाध्यक्ष राजू भाऊ सूर्यवंशी, भीमराज सेनेचे राजू थाटे तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष बाळा भाऊ पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक क्षेत्रात विविध माध्यमातून योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला.
निलेश गुरचळ हे सातत्याने समाजकार्यात अग्रेसर राहून समाजातील विविध अडीअडचणी तसेच नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील असतात. सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांना मदत करण्यासह विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ‘समाज रक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सन्मानामुळे सामाजिक कार्यासाठी आणखी प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
